मनाचा एक घातक खेळ. कारण हा खेळ जर मन जिंकले, तर तुम्ही उरलेले सर्व खेळ हरून जाल एवढी ताकद यात आहे. मुळात हा खेळ च बाकी सर्व खेळांचे मूळ आहे अस म्हणायला हरकत नाही!
आपण कुठली गोष्ट जास्त करतो?
जी आपल्याला आवडते!
आपल्याला कुठली गोष्ट का आवडते?
कारण ती आपल्याला कम्फोर्ट झोन मधे घेऊन जाते!
आपण गाणे ऐकतो, कारण ते आपल्याला सुखवतात आणि मनाला आराम देतात..
आपण अभ्यास करत नाही, ते आपल्याला आराम देत नाही म्हणून..
आपण श्वास घेतो, कारण ते आपल्याला जिवंत ठेवते, आणि जिवंत राहून आराम मिळतो... मरणे वेदनादायक असते..
तर होते असे की, प्रत्येक गोष्ट आपण या झोन मधे जाण्याकरिता करत असतो. साइकल नंतर बाइक नंतर कार. रूम नंतर घर नंतर बंगला. म्हणजे कुठे ना कुठे आपले ध्येय या कम्फोर्ट झोन शी निगडीत आहेत, यात वाईट काही नाही. पण याच झोन मधे असल्या मुळे ध्येय गाठण्याचे बळ अंगी जमत नाही आणि मग आपण आहे त्या गोष्टीशी समाधान मानणे शिकतो. पंख छाटले जातात. आशा लोप पावतात. आणि मग आपण "ठेवीले अनंती तैशेची राहावे!" वर येऊन थांबतो...
गेम प्लान :
ह्या खेळाचा हुकुमाचा इक्का आहे "तुमचे ध्येय". कम्फोर्ट झोन नेहमी तुमच्या या इक्क्याला हरवायचा प्रयत्न करणार म्हणून सोबत या खेळात काही अष्टपैलू खेळाडू सोबत ठेवणे गरजेचे आहे.
१. इच्छाशक्ती
२. जिद्द
३. प्रेरणा
४. कार्यक्षमता
आपल्या ध्येयाने प्रेरित होऊन प्रचंड इच्छाशक्ती च्या बळावर जिद्दीने कार्यक्षमतेचा उपयोग करून या कम्फोर्ट झोन चा धाचा फोडून काढायचा आणि झेप घ्यायची उंचच उंच असलेल्या त्या ध्येया कडे!
हे करत असताना नेहमी असे वाटेल की आपण एवढ्या सुविधा सोडून असुविधे कडे का वळतोय, तेव्हा सतत हा विचार करा की, "जे ध्येय आपण मिळवणार आहोत ते आपण च स्वप्न म्हणून पहिलय. आणि स्वप्न नेहमीच सद्य परिस्थिती पेक्षा अधिक चांगले होण्यासाठी असतात. म्हणून ध्येयात समाधान आहे. त्याची मजा वेगळी आहे. ते फळ चाखायच असेल तर फुलांना खाऊन काय उपयोग!"
आराम नकोच अस नाही! मधे मधे "पावर नॅप" हवाच... तो तुम्हाला शांती देईल. वर आपण ध्येया कडे वाटचाल करतोय याच समाधान असेलच...
एकदा का या गेम ला जिंकलात की मग पुढच काम सोप आहे.

Comments
Post a Comment