करोडो वर्षांपूर्वी जेव्हा मानव प्राण्याची उत्पत्ती झाली व त्याचा मेंदू विकसित व्हायला लागला तेव्हा त्याला कळाले की कामे संघटित होऊन केली तर ती सोपी होतात. मग माणूस कळपाणे राहू लागला. प्रजनन शक्ति ची जाणीव झाल्यावर कुटुंब तयार झाले. मग कुटुंबाचे कळप."कळप" म्हणजे कुठलीही नाळ नाही व कुठलीही जाणीव भावना नाही. म्हणून मग समविचारी लोक एकत्र राहायला लागली, आपली संहिता बनवून पाळायला लागली. त्याने काय झाले की, एकमेकांवर अवलंबुन राहू शकणारे कळप बनवू लागले ज्याला आज आपण "समाज" म्हणतो!
मग मेंदू अधिक विकसित होत गेला. उपजीवीके बरोबरच आरोग्य, खेळ, मनोरंजन, आनंद, आरामदायकता या व इत्यादी सर्वांची गरज वाटू लागली. मग ह्या सगळ्यांची पुर्ति करण्यासाठी समाजात च उत्तर शोधू लागला. भीती व चिंता सारख्या स्वभाव लहरींनी त्रासू लागला आणि मग जन्म झाला अध्यात्माचा. विकसित मेंदू चा अविष्कार आहे "अध्यात्म". अंतर्मुख होऊन एका अविभाज्य सर्वोच्च शक्ति च्या अस्तित्वावर विश्वास ठेवून त्याला समर्पित होऊन आपल्या सर्व चिंता ना मेंदू पासून दूर ठेवायच्या. श्रद्धा व विश्वास मानवी जीवनाला कलाटणी देऊन गेल्या.
अश्या अनेक छटा मानवी मेंदू ला पडत गेल्या आणि मग मानवी उत्क्रांती बरोबर सुरू झाले
मनाचे खेळ!
Comments
Post a Comment