Skip to main content

Posts

खेळ २ : कम्फोर्ट झोन : आ(ह)राम क्षेत्र

मनाचा एक घातक खेळ. कारण हा खेळ जर मन जिंकले, तर तुम्ही उरलेले सर्व खेळ हरून जाल एवढी ताकद यात आहे. मुळात हा खेळ च बाकी सर्व खेळांचे मूळ आहे अस म्हणायला हरकत नाही! आपण कुठली गोष्ट जास्त करतो? जी आपल्याला आवडते ! आपल्याला कुठली गोष्ट का आवडते? कारण ती आपल्याला कम्फोर्ट झोन मधे घेऊन जाते! आपण गाणे ऐकतो, कारण ते आपल्याला सुखवतात आणि मनाला आराम देतात.. आपण अभ्यास करत नाही, ते आपल्याला आराम देत नाही म्हणून.. आपण श्वास घेतो, कारण ते आपल्याला जिवंत ठेवते, आणि जिवंत राहून आराम मिळतो... मरणे वेदनादायक असते.. तर होते असे की, प्रत्येक गोष्ट आपण या झोन मधे जाण्याकरिता करत असतो. साइकल नंतर बाइक नंतर कार. रूम नंतर घर नंतर बंगला. म्हणजे कुठे ना कुठे आपले ध्येय या कम्फोर्ट झोन शी निगडीत आहेत, यात वाईट काही नाही. पण याच झोन मधे असल्या मुळे ध्येय गाठण्याचे बळ अंगी जमत नाही आणि मग आपण आहे त्या गोष्टीशी समाधान मानणे शिकतो. पंख छाटले जातात. आशा लोप पावतात. आणि मग आपण " ठेवीले अनंती तैशेची राहावे! " वर येऊन थांबतो... गेम प्लान : ह्या खेळाचा हुकुमाचा इक्का आहे " तुमचे ध्येय ...
Recent posts

खेळ १ : लोकोफोबिया : लोक काय म्हणतील!

मनाचा सगळ्यात खतरनाक खेळ!!! म्हणून याला पहिले मांडतोय. कुठलेही काम करायच्या आधी, कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आपल्याला पडलेला एक गहन प्रश्न... या प्रश्णामुळे आपण नेहमीच आपल्या ध्येयापासून एक पाऊल दूर असतांना माघारी पळ काढतो. कधी कधी तर सुरूवात पण करत नाही. गेम प्लान : आपण आपल्या क्रीयेसाठी च कारणीभूत असतो, दुसर्‍याच्या प्रतिक्रिया किंवा त्यांची मते किंवा त्यांचा प्रतिसाद हा कधीच आपल्या इच्छे ला बांधील नाही! म्हणून लोक कसे प्रतिक्रिया देतील किंवा त्यांच्या आयुष्यात काय फरक पडेल याचा विचार आपण ना केलेला च बरा, जोपर्यंत आपण एखाद चुकीच काम करत नाहियोत. पण आपल्याला असा प्रश्न पडतोच का?? इथेच तर खरी मेख आहे! याच उत्तर आहे मनाच्या पुढच्या खेळात...

सुरूवात - अगदी शून्यातून !

करोडो वर्षांपूर्वी जेव्हा मानव प्राण्याची उत्पत्ती झाली व त्याचा मेंदू विकसित व्हायला लागला तेव्हा त्याला कळाले की कामे संघटित होऊन केली तर ती सोपी होतात. मग माणूस कळपाणे राहू लागला. प्रजनन शक्ति ची जाणीव झाल्यावर कुटुंब तयार झाले. मग कुटुंबाचे कळप. "कळप" म्हणजे कुठलीही नाळ नाही व कुठलीही जाणीव भावना नाही. म्हणून मग समविचारी लोक एकत्र राहायला लागली, आपली संहिता बनवून पाळायला लागली. त्याने काय झाले की, एकमेकांवर अवलंबुन राहू शकणारे कळप बनवू लागले ज्याला आज आपण "समाज" म्हणतो!              मग मेंदू अधिक विकसित होत गेला. उपजीवीके बरोबरच आरोग्य, खेळ, मनोरंजन, आनंद, आरामदायकता या व इत्यादी सर्वांची गरज वाटू लागली. मग ह्या सगळ्यांची पुर्ति करण्यासाठी समाजात च उत्तर शोधू लागला. भीती व चिंता सारख्या स्वभाव लहरींनी त्रासू लागला आणि मग जन्म झाला अध्यात्माचा. विकसित मेंदू चा अविष्कार आहे "अध्यात्म" . अंतर्मुख होऊन एका अविभाज्य सर्वोच्च शक्ति च्या अस्तित्वावर विश्वास ठेवून त्याला समर्पित होऊन आपल्या सर्व चिंता ना मेंदू पासून दूर ठेवायच्या. श्रद्धा व विश्वास मा...